१० नियम

   कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत- १० नियम

  नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

  नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

  नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .

  नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

  नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

  नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

  नियम ७ – उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्दत मात्र वेगळीच असते. ख-या जगात हरणार्‍याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

  नियम ८ – आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

  नियम ९ – टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. ख-या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.

  नियम १० – स्वप्न ते नाहीत जे तुम्ही रात्री झोपेत बघतात , स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही ।
  Think Good! Do Good!! Be Good!!!

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *