स्वतःला जिंका | Win Yourself

  आपल्या प्रत्येकाचं एकच अंतिम ध्येय असते ते म्हणजे आनंदी होणे. आनंदी होण्यासाठी आपण कोणत्या प्रकारे जगायला पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर ज्याला महिती आहे तोच त्यासाठी प्रयत्न करतो आणि आनंदी होतो.

  स्वतःच्या यशाची व्याख्या करा | Definition For Your Success

  तुम्हाला कोणत्या गोष्टी केल्यावर आनंद आणि परिपूर्ण वाटेल. तुमचं आयुष्य प्रत्येक गोष्टीने परिपूर्ण झाले किंवा करता आले तर तुम्ही त्याचे वर्णन कसे कराल.
  तुमचे भविष्य, कौटुंबिक जीवन, आरोग्य
  आणि तुमची आर्थिक परिस्थिती परिपूर्ण, आनंददायी असेल तर त्याचे वर्णन कसे कराल आणि तसे करण्यासाठी तुम्ही कोणती कृती ताबडतोब करायला सुरुवात कराल ?
  जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या यशाची व्याख्या करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला यशप्राप्तीसाठी आवश्यक गोष्टी आढळून यायला सुरुवात होते.
  जर तुम्ही सबबी देणे टाळलात आणि स्वतःला शिस्त लाऊन घेतलात तर तुमच्या यशच्या अंतिम ध्येयापर्यंत तुम्हाला मागे खेचणारे कोणीच नाही.

  स्वयंशिस्त असणे – अतिआवश्यक आहे | Self Discipline – Most Important

  तुम्ही काय करायला पाहिजे ते तुम्हाला माहीत असतेच. फक्त अभाव असतो ते स्वयंशिस्तीचा तुमच्या यशच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी करणे आवश्यक असते. मग ते करण्याची तुमची इच्छा असो वा नसो. ते करण्याची आवश्यक आहे. शिस्त-स्वयंशिस्त.

  जे पेराल तेच उगवेल | What You Sow- You Will Get That

  जगातील बऱ्याच श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तीने शून्यापासून सुरुवात केली आहे. अधिक चांगले शिक्षण होतेच असे नाही. काहीजणांजवळ अधिक चांगली बुद्धिमत्ता नव्हती, पण इतर लोकांपेक्षा अधिक कठीण परिश्रम करायची तयारी होती आणि त्यांनी ते साध्य केले स्वयंशिस्तने.
  “कारण आणि परिणाम यांचा महान नियम त्यांनी जाणून घेतला होता”
  मला काय पाहिजे? ते का पाहिजे? आणि त्याचे परिणाम मला हवे तसे मिळतील का? या प्रश्नांची उत्तर त्यांच्याजवळ होते. म्हणुनच त्यांनी कारण आणि परिणामाचा नियम समजुन घेऊन ते केले जे केल्याने त्यांना हवे तसे परिणाम मिळतील.
  लक्षात ठेवा :- तुम्ही जर ते केलात जे यशस्वी केले तर परिणामस्वरूप तुम्हाला तेच मिळेल जे यशस्वी लोकांना मिळेल.

  कारण आणि परिणामाचा नियम

  परत परत तेच करा, जे यशस्वी लोकांनी केले. त्या गोष्टी करण्याची सवय लाऊन घ्या. यश किंवा अपयश हा कोणताही अपघात नाही तर ते आपण केलेल्या विचारातून आणि कृतीतून मिळालेले परिणाम आहेत.
  जर तुमची  खरोखरच प्रबळ इच्छा आणि तुम्ही जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आणि सातत्याने काम करता आणि तुमच्या यशाची घडण करण्यासाठी आवश्यक गोष्टींच्या मागे असता तेव्हा त्यातून मिळणारे परिणाम म्हणजे तुम्ही तुमच्या यशच्या जवळ जाता.

   

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *