मी यशस्वी होणार – पण कसे ? | I Will Be Successfull- But How?

  successful life

  मी यशस्वी होणार – पण कसे ? |  I Will Be Successful- But How?

  काही लोक खूप यशस्वी(successfull) का असतात? ते असं काय करत असतात की ते तेवढ्याच वर्षात इतरांपेक्षा जास्त पैसा किंवा त्यांना हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळवतात.

  काय रहस्य असेल या यशच ! | What Is The Secret Of Success!

   

  अशी कोणती गोष्ट यशस्वी लोक करतात त्यामुळे ते इतर लोकांपेक्षा जास्त यशस्वी होतात?

  आपल्या प्रत्येकाला अधिक पैसे मिळवायचे असतात. आपल्या कुटुंबा सोबत आणि आपल्या माणसांसोबत जास्त वेळ पण घालवायचा असतो. स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची तब्येत उत्तम आणि एकदम ठणठणीत ठेवायची असते. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रता पण मिळवायची असते. प्रत्येकाला जवळपास सारख्याच प्रकारच्या गोष्टी मिळवायच्या असतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यातील प्रत्येकाला आपल्यला पाहिजे ते कसं मिळवायचं हे देखील महिती असतं.

  पण प्रत्येकजण यशस्वी होताना दिसतो का ? प्रत्येकजण त्याला महिती असून सुद्धा ती गोष्ट करतात का – जे केल्याने तो यशस्वी होईल?

  या प्रश्नाचं उत्तर आहे “नाही”?

  कारण यशस्वी होण्यासाठी खूप कठीण मार्गावरून जावे लागते आणि यश मिळविण्यासाठी वेळ लागतोच. प्रत्येकाला लवकर किंवा कमी वेळात सगळं हवे असते. थोडक्यात बोलायचं तर लवकर आनंद मिळेल अशी गोष्ट त्यांना करायची असते. उदाहरणार्थ :- आपण रात्री झोपताना सकाळी लवकर उठायची बेल लावतो पण प्रत्यक्षात आपण त्यावेळी किती वेळा उठतो. आपण बेल बंद करून परत झोपतो अशासाठी की, अजून झोपल्याने आपल्याला अजून बरे वाटते किंवा आनंद वाटतो.

  उद्याच्या दिवसाला हद्दपार करा

  आपण नेहमीच ठरवतो की, मी हे उद्या करेन किंवा मी ते करायला उद्यापासून सुरवात करेन पण खरं बघायचं झाले तर उद्या नावाची कोणतीही गोष्ट किंवा दिवस आपल्या जीवनात कधीच येत नाही.

  जगातील ८०% लोक या उद्याची वाट बघत असतात किंवा त्या कधीतरी वाल्या दिवसाची वाट बघत असतात. पण प्रत्यक्षात काहीच होत नाही.

  उद्याच्या किंवा कधीतरीच्या या गजबजलेल्या जगात राहणाऱ्या माणसांच्या समस्या जवळपास सारख्याच असतात. ‘मला हे नाही मिळालं म्हणून मला ते करणे शक्य नाही झाले’. माझ्याजवळ हे नव्हते, ते नव्हते या सारख्या सबबी सांगण्यातच त्या लोकांचा “आजचा” दिवस निघून जातो.

  ज्याला प्रत्यक्षात यशस्वी व्हायचच आहे त्याला उद्या म्हणजे काय हे माहितीच नसते. आज मी जे काही करणार त्यावर माझे यशस्वी होणे शक्य आहे, हे त्यांना महिती असते.

  लक्षात ठेवा :- उद्या अस्तित्वात नाही त्यामुळे उद्याला आजच तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि आजच कामला लागा.

  यशस्वी होण्यासाठी कृती करा  | Take Action To Be Successful

  सबबी देण्यापेक्षा कृती करायला सुरवात करा. सबबी देणे टाळा. सबबी देण्याच्या अतिशय वाईट कामासाठी तुमच्या मेंदूचा उपयोग टाळा. काहितरी करा पण सुरवात करा. स्वतःशी बोला माझे जीवन कशाप्रकारे जगायचे ते मला महिती आहे. मला जे काही पाहिजे किंवा जे काही मिळवायचं आहे त्यासाठी मी माझ्यावर अवलंबुन आहे ते करण्यासाठी मी [“तुमचं नाव“] सुरुवात करत आहे. असे म्हणून त्वरित कृती सुरुवात करा.

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *