मार्ग भरकटतो तेव्हा | When You Get Interruption In Your Life

  confuse mind

  जेव्हा आपण आपले लक्ष्य विसरलात तेव्हा | When Your Forget About Your Goal

  एक मुलगा फक्त शिक्षण घेण्यासाठी गावाहून मुंबईला येतो.

  कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो. कॉलेज चालू होते. नित्यनेमाने नेहमी कॉलेज जातो. काही काळा नंतर अभ्यास कमी आणि मोबाइल वर जास्त वेळ घालवायला सुरू होते.

  कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षा मध्ये तो मस्त आरामात उत्तीर्ण होतो. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास एवढा वाढतो की, त्याला वाटू लागते की शेवटच्या वर्षात पहिल्या दोन वर्षा प्रमाणे उतीर्ण होईन.

  शेवटच्या वर्षा मध्ये  facebook  च्या माध्यमांतून एका मुलीवर प्रेम जडते. काही महिन्यानंतर त्याच्या प्रेमामध्ये ताटातुट होते. मुलगी माघार घेते. कदाचित तिने तिच्या अभ्यासावर सर्व लक्ष केंद्रित करता यावा यासाठी तिने माघार घेतली असावी. मुलगी घरची सर्व कामे करून देखील ती तिच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षात उतीर्ण होते. पण मुलाचा निकाल मात्र याच्या उलट उलट लागतो. घरातली कोणतीही जबाबदारी नसताना किंवा कोणतेही काम न करता मुलगा शेवटच्या वर्षात नापास होतो.

  तो मुलगा नापास झाल्यावर देखील हसून खेळून राहण्याचे सोंग करत असतो बहुतेक तो स्वतःच्या मनाची समजूत घालत असेल.

  दुखः एवढ्याच गोष्टींचं आहे की, मुलगा कॉलेजच्या शेवटच्या वर्षी त्या मुलीसाठी स्वतः मुंबई मध्ये येण्याचा हेतू विसरतो. ज्या आई-वडिलांनी एवढय़ा अपेक्षेने शिक्षणासाठी पाठवलेले असते त्यांना तो अनुत्तीर्ण झाल्याचा निकाल दाखवतो.

  का हे असे?

  तो मुलगा आपण मुंबईला का आलो हे विसरला?

  माझ्या आई-वडिलांनी का येथे पाठवलं?

  कॉलेजला प्रवेश का घेतला होता?

   

  जर मनुष्य जीवनातील हेतू विसरला तर तो नक्कीच स्वतःचा मार्ग भरकटतो.

  म्हणुनच सांगावे असे वाटते की, नापास झाल्याची लाज बाळगा, मनाची नसली तरी जनाची असूदे. परत अभ्यास करा पास व्हा. कोणतीही गोष्ट टाईम पास म्हणून घालवू नका एक जबबदारी म्हणून पार पाडा.

  आगावू वेळेत काम करून राहिलेले विषय सोडवा अशाने तूमचा वेळ वाया जाणार नाही. तुम्हाला कामाचा अनुभव देखील मिळेल आणि भविष्यात त्याचा उपयोग देखील होईल. अनुभवामुळे तुम्हाला कुठे नोकरी साठी गेल्यावर अनुभवाची कमतरता भासणार नाही आणि तुम्हाला भविष्यात कधी एक वर्ष गमावल्याचं दुखः न वाटता स्वतःचा अभिमान वाटेल.

  मी बोलते जबाबदारी घ्या ती मग छोटी का असेना. जीवनातील धडा नक्कीच चांगला अनुभव देईल त्या अनुभवातून नक्कीच आपले भविष्य उज्वल होईल.

  आज अनुत्तीर्ण झालात म्हणून आई-वडील तुमच्या वर नक्कीच निराश होतील पण जबाबदारी घ्यायला शिकलात तर आई-वडील निराश न होता तुमच्याबद्दल अभिमान व्यक्त करतील.

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *