धीर सोडू नको | Don’t Quit

  don't quit

  धीर सोडू नको | Don’t Quit

  जेव्हा संकट समोर असते आणि सगळे मार्ग बंद होतात. आवश्यक गोष्टी जवळ नसतात आणि कामे खूप असतात तेव्हा धीर सोडू नको. मनाला निराश होऊ देऊ नको.

  लक्षात ठेव जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा त्या अंधाऱ्या खोली मधून बाहेर जाण्यासाठी एक तरी जागा असते जी आपल्या त्या कठीण परिस्थिती मध्ये लगेच लक्षात येत नाही.

  अशा वेळी मनाला शांत कर आणि विचार कर तुझ्या त्या सगळ्या परिस्थिती मधून बाहेर जाण्याचा मार्ग नक्की तुला मिळेल.

  गरज आहे ती फक्त आपल्या मनाला शांत ठेऊन आपल्या अंतरमनाचे ऐकण्याची. असे मन जे आपल्याला कधीच चुकीचे मार्गदर्शन करत नाही. आपल्या ला जे पाहिजे ते मिळवुन देणारे असते ते आपले अंतरमन.

  कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी गरज असते थोड्या संयम ठेवण्याची आणि मनाला सकारात्मक बनवण्याची मग बघा आपल्याला पाहिजे तेच मिळेल.

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *