दूरदर्शीपणाची सवय करा Habits For Success

  झटपट यशाची घाई करू नका | Success Is Possible , But Not Immediate

  बहूसंख्य लोकांना सगळे झटपट पाहिजे असते. मग हे लोक सहज मिळणारा पैसा आणि झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग शोधत असतात पण प्रत्यक्षात असे मार्ग शोधून झटपट यश मिळविण्याची आशा ठेवणाऱ्या लोकांना त्यांच्या अपेक्षित कामगिरीपेक्षा कमीच मिळते किंवा त्यात त्यांचे नुकसान ही होते. अशा लोकांना सोप्या कामातूनच जास्त आनंद मिळतो पण जे यशासाठी आवश्यक असतं ते करण्याकडे दूर्लक्ष करतात आणि शेवटी त्यांच्या हाती काहीच येत नाही.

  यशासाठी आवश्यक गोष्टी करणे अतिआवश्यक आहे | For Successful Life – Do Important Things

  जे तुम्ही होण्या योग्य आहात ते होण्याची इच्छा असेल तरच आवश्यक काय आहे आणि मोह काय आहे याचा विचार प्रत्येक दिवशी प्रत्येक मिनिटाला केला पाहिजे. कमीतकमी त्रासाचा मार्ग टाळला पाहिजे. स्वतःच्या विचारांवर प्रभुत्व मिळवलं पाहिजे. जी गोष्ट अनावश्यक आहे ती स्वतःहून नाकारणे त्यासाठी आवश्यक आहे.

  भविष्याचा विचार करून भविष्यात मिळणाऱ्या महान फायद्यांसाठी आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी स्वयंशिस्तीची गरज असते आणि ती अतिआवश्यक आहे.

  यशस्वी व्हायचंच आहे तर त्याग करायची तयारी ठेवा | To Be Succesful – Ready To Do Everything

  जे लोक आता पर्यंत यशस्वी झालेले दिसतात त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप लहान-मोठे त्याग केलेले असतात. दूरदर्शीपणाच्या सवयीसाठी काहीवेळा त्याग करणे सुध्दा अतिआवश्यक असते.

  दीर्घकालीन यशच्या पुर्ततेसाठी वर्तमान काळात मिळणाऱ्या अल्पकालीन मजेचा आनंद लुटण्याचा त्याग करतात. दीर्घकालीन यशासाठी जे आवश्यक आहे तेच करून स्वतःला अधिक मौल्यवान बनवतात जेणेकरून ते ८०% सामन्य लोकांपेक्षा २०%.लोकांमध्ये राहून अधिक चांगले आयुष्य जगतात.

  लॉँगफेलोने एकदा लिहिले आहे. यशस्वी लोकांना अचानक काही मिळालेलं नाहीच तर ते तेव्हा उशिरापर्यंत काम करत होते जेव्हा त्यांचे मित्र निद्राधीन होते.

  यशस्वी व्हायचंच आवश्यक त्याच सवयी लावून घ्या | Habits For Succesful Life

  प्रत्येक माणूस यशस्वी व्हायच्या आधी जगातील ८०% सामन्य लोकांमध्येच असतो पण जेव्हा तो ठरवतो की त्याला जगातील २०% लोकांमधे म्हणजेच यशस्वी लोकांमध्ये जाणे अतिआवश्यक आहे, तेव्हा त्याला त्या २०% लोकांसारख्या सवयी लावून घेणे सुध्दा आवश्यक आहे.

  लक्षात ठेवा:- यशस्वी लोकांप्रमाणे सवयी लावून घेणे कठीण आहे पण तेच आवश्यक आहे स्वतःला यशस्वी बनविण्यासाठी.

  तणाव दूर करणाऱ्या कामांमध्ये स्वतःला व्यस्त ठेवू नका. उद्दिष्ट ठरवलच आहे आणि काही झाले तरी ते उद्दिष्ट साध्य करायचंच आहे तर त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामांमध्ये अधिक व्यस्त रहा. त्या कामांचा अधिक रस घ्या.

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *