दर्जेदार इच्छाशक्ती | will-power

  यशस्वी होण्यासाठी ३ गोष्टी करा | 3 Things For Success

  यशस्वी व्हायचच आहे मग वेळ का घालवताय तुमच्या समोर मार्ग दिसतात त्यावरून जाण्यासाठी पहिले ठरवा – काय पाहिजे तुम्हाला? त्याचा निर्णय घ्या. दुसरे – ते मिळविण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय किंमत चुकवावी लागेल ते निश्चित करा आणि तिसरे – ती किंमत चुकवायचा निश्चय करा.

  या तिन्ही पायऱ्या चढून जाण्यासाठी तुम्हाला आवश्यकता असेल ती तुमच्यातील दर्जेदार इच्छाशक्तीची आणि किंमत चुकती करण्याची तयारी.

  नुसत्या इच्छा बाळगून किंवा सबबी देऊन कोणी यशस्वी होत नाही. उद्दीष्ट ठरवलं आहे आणि काही करून ते मिळवायचंच आहे तर स्वतःला शिस्त लावून घ्या.

   

  तज्ञांकडून शिकलेच पाहिजे  | Learn From Expert

  यशासाठी लागणाऱ्या स्वयंशिस्तीनंतर दुसरे सर्वात महत्वाचं तत्व म्हणजे तज्ञांकडून शिकणे. त्यांच्या पुस्तकाचे वाचन करणे आणि ते आत्मसात करणे त्याचे चर्चासत्र ऐकणे.

  तज्ञांच्या अनुभवातून आणि ज्ञानातून तुम्ही कमी कालावधीमध्ये जास्त ज्ञान आत्मसात करू शकता जे मिळविण्यासाठी तुमचं आयुष्य खूप छोटा आहे.

  तुमच्या क्षेत्रातील तज्ञ लोकांना भेटा. त्यांचे कार्यक्रम पहा youtube ला त्यांचे वीडियो पहा आणि त्यांनी जे सांगितलंय त्याचे पालन करा. तुमच्या लवकर यश प्राप्तीसाठी हे खूप आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्हाला हवी तशी होत नाही. तोपर्यंत प्रत्येक दिवशी तुमच्या क्षेत्रातील अभ्यास करत रहा.

   

  तुम्ही पूर्वी कधी नव्हता असे व्हा

  स्वयंशिस्तीचे पालन करा. तुमच्या मनावर आणि भावनांवर स्वयंशिस्तीचे पालन करा. एक प्रभावी व्यक्तिमत्व बनवा. स्वतःचा विकास करा. एक वेगळी व्यक्ति समजून.

  ज्याला काही आकार नव्हता, जे अतीशय भावूक होते, मृदु होते त्या तुमच्या व्यक्तिमत्वाला स्वयंशिस्तीची उष्णता देऊन एवढं कठीण करा की, कोणीही एक शक्तिशाली आणि दृढनिश्चयी व्यक्ति बना. एक वेगळी व्यक्ति बना जी पूर्वी कधी नव्हती.

  लक्षात ठेवा :- पूर्वी कधी मिळवले नाही, ते मिळवायचं असेल तर ती व्यक्ति व्हा जी पूर्वी कधी नव्हती. निवड तुमची आहे.

  अभ्यास व सराव करा – जो कधी केला नव्हता

  स्वयंशिस्तीचा वापर करून असे गुण आणि कौशल्य यांचा अभ्यास आणि सराव करा, जे तुम्ही पूर्वी कधीच केले नव्हते. स्वयंशिस्तीच्या आणि यशच्या कठीण शिडीवर चढता चढता तुम्ही एक उच्च चारित्र्याची आणि निश्चय व्यक्ति बनता.

  यशस्वी होणे म्हणजे नुसता पैसा कमवणे नव्हे तर यशासाठी लागणाऱ्या त्या सगळ्या सर्वोत्कृष्ट गोष्टी मिळवून किंवा आत्मसात करून एक उत्कृष्ट व्यक्ति बनते.

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *