एखाद्याच्या घरात रहायला आपल्याला जागा हवी असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्ति च्या मनात जागा करणे | Secret Of Marketing

  loyal client

  मनात जागा करणे – ती जपून ठेवणे

  काल अशीच emailer च्या subject line बद्दल चर्चा चालली होती . त्यासाठी आम्ही आमच्या competitor चा रेफेरन्स घेत होतो. email ची subject line कशी असावी जेणेकरून आपल्या product promotion साठी ते जास्त फायद्याचं असेल. यावर बोलताना मी competitor च्या email subject line च्या referance घेऊन बोलली की, एखाद्याच्या घरात रहायला आपल्याला जागा हवी असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्ति च्या मनात जागा करणे महत्वाचे असते आणि ती जपून ठेवणे त्याहून महत्वाचे असते.

  Meaning Is Important  | विचार करणे अती आवश्यक असते.

  हे वाक्य ऐकायला खूप मार्मिक वाटते पण त्याचा नीट विचार केला तर त्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. कोणत्याही प्रकारचे विश्वासपूर्ण काम करण्यासाठी म्हणा किंवा कोणतेही चांगले नाते बनविण्यासाठी म्हणा नाहीतर कोणत्याही product च्या promotion साठी किंवा marketing साठी या logic चा विचार करणे अती आवश्यक असते.

  Marketing line मध्ये विचार करायचा तर कोणताही product त्या company च्या विश्वासपूर्ण service आणि quality वर अवलंबून असते. म्हणजेच जर तुमच्या कंपनीने एखाद्या client ला उत्तम product दिले तर तो client दुसऱ्या कंपनी जवळ जायचा विचार करणे सुद्धा खूप लांबचा विचार आहे पण कंपनी service देते quality देते पण त्या same client ला अधिक चांगली service आणि quality दुसऱ्या कंपनी जवळ मिळत असेल तर कदाचित तो पहिली कंपनी change करू शकतो. पण जर पहिल्या कंपनीने त्या client च्या मनामध्ये जर नेहमीच चांगली जागा बनवून ठेवली तर तो client काहीही केल्याने दुसऱ्या company जवळ जाणार नाही.

  Related Post

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *